Posts

Showing posts from March, 2019

असेही एकदा व्हावे

असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जुने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस आपण आठवतो त्यात हा पहिला असतो आपण त्या दिवसामध्ये किती मस्ती मज्जा करत असायचो. ते दिवस पण काय होते जिथे कमी बंधने होती आणि लाड जास्त होत असायचे जास्त आणि चूक जर झाली तर मार पडायचा पण त्यात प्रेम पण असायचे. ते दिवस असे आहे ते जगण्यासाठी मी आत्ता त्या वेळेत जाऊ शकतो. कारण त्या वेळेमध्ये ना मोबाईल, टीव्ही, ना प्ले स्टेशन नाही व्हॉटसअप आणि फेसबुक सुद्धा पण लहान होण्याचा जास्त फायदा होता लाड जास्त होत असतात आपले पण सर्वात जास्त लाड एकाचे होतात ज्या घरामध्ये सर्वात लहान जो असायचा त्याचा लाड खूप जास्त होत असतो. ते जाऊद्या पण लहान पणाची काय मज्जा होती काही सकाळी लवकर उठणे तयार होणे, पूजा करणे, शाळा दुपारची असल्यामुळे आपण थोडे लेट उठयाचो पण काहीची शाळा सकाळी होती त्यांना जर लवकर उठावे लागत होते. घरी वापस आले की आपण आपला अभ्यास करून कारण...

LIFE MEANS WHAT....?

1.रात्री च एकटाच long drive ला निघालेलो ....सोबत गार वारा ...आणि हेड फ़ोन मध्ये अरिजित सिंग ची गाणी ...... 2.रात्रीं 1 ची वेळ हातात गरमागरम चहाचा कप ....मी आणि ती balcony मध्ये थांबलेलो ...मंद असा गार वारा वाहत असेन ...तिने घट्ट असा दोन्ही हाताने चहाचा कप धरून ठेवला असेन...आणि आमच्या कॉलेज च्या गप्पा चालू असतील कि मी किती मूर्ख होतो आधी...... 3.एक गाडी ..मोकळा रस्ता...गाडीत फक्त ती आणि मी ..रात्रीची वेळ... खिडकीतून तिचे केस उडवत येणारा गार वारा...आमच्या दोघातील ती शांतता ...... .आणि त्या क्षणी मी रेडिओ लावावा ...आणि लग जा गले हे गाणं लागावं ...आणि आम्ही दोघे हि एकमेकांकडे बघून हसावं ... 4.रात्र झालेली असेन ...बाहेर गुलाबी थंडी ..आणि रोड वर ती आणि मी दोघेच ...गप्पा मारत एक long walk ला चाललेलो ...आणि अचानक चहाची टपरी दिसावी... 5.मी कॉलेज ला जात असावो ...पाऊस येत असावा ...मी छत्री घेऊन चालत असावो..आणि तिची छत्री विसरली म्हणून अचानक ती छत्री मध्ये यावी ... 5. लग्न झाल्यावर ....एक दिवस मी kitchen वट्ट्यावर बसलेलो असावो ...ती चपात्या लाटत असेन....आणि मी तिला तिच्यावरच्या सगळ्या कविता ऐकवत अ...

स्वप्नातला समुद्र

प्नातला समुद्र.... शांत असा गार वारा वाहत असेन त्याला नारळाची झाड साद घालत असतीन .लाटांचा तो हवाहवासा वाटणारा आवाज कानी पडत असेन .ती आणि मी समुद्र किनारी मृदू वाळूत बसलेलो .एक टेबल दोन खुर्च्या तिथे ती आणि मी दुसर कोणीच नाही त्या टेबल वर एक मेणबत्ती जळत असेन त्यात ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे पाहत बसलेलो ...त्या मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तिची सोनेरी कांती आणखीनच उजळ भासेन ...तिला मी आणि मला ती पाहण्यात पूर्णपणे हरवलेलो असेन....तेव्हाच हळूच एक थंड गार वाऱ्याची झुळूक आम्हा दोघांना स्पर्शून जाईन ..आणि अंगावर ते हवेहवे से वाटणारे मखमली शहारे येतील ...आणि अशातच कुठेतरी मनाला भुलवणार छान स गाणं ऐकू यावं आणि ते ऐकतच मी तिच्या प्रेमात पुन्हा पडावं...तिचा हात हातात घ्यावा आणि तिच्या डोळ्यात पाहतच राहावं ....तो क्षण तिथेच कैद व्हावा आणि त्या क्षणातच मी तिच्याबरोबर पूर्ण आयुष्य जगावं ...ती रात्र सरूच नये खूप बोलायचं तिच्याशी ........... दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके ..!!!

MY FANTASY

मला एक अशी व्यक्ती हवीये जी माझ्या सारखी crazy..प्रसंगी कठोर तरी हळव्या मनाची ......ध्येय वगैरे अशा जड शब्दांच्या मागे लागून आयुष्य वाया न घालवणारी ....भविष्याचा विचार न करता त्या क्षणाचा आनंद लुटणारी .कारण कोण किती जगणारे कुणाला ठाउकें...एकदा तिच्या सोबत जग फिरायला जायचंय ... कुठली planning नाही ना कुठे जायचं हे हि माहित नाही ..फक्त बॅग उचलायची ,गाडीला किक मारायची आणि रास्ता जाईल तिकड़े जायचं.. फक्त ती सोबत हवी..तिच्याबरोबर त्या पहिल्या पावसातील पहिली सर अनुभवायचीये ..तिच्यासोबतचा तो पहिला मातीचा गंध आयुष्यभरासाठी उरी साठवून ठेवायचाय... पावसात तिच्या हातांचा होणार स्पर्श प्रत्येक पावसाळ्यात अनुभवायचाय .इतकच नाही तर तिच्या बरोबर वेड्या सारखं नाचायचंय आणि तिच्या बरोबर म्हातारही व्हायचंय . उतार वयात एकांतात सगळ्या जगापासून दूर कुठे तरी समुद्रा किनारी राहायचंय...तिथे फक्त मी माझ्या कविता शांत समुद्र आणि ती...समुद्रा किनाऱ्याच्या दगडांवर बसून पाय पाण्यात घालून तासन तास  तिच्याशी गप्पा मारायच्यात...सांजवेळी मंद गार वारा वाहत असेन तेव्हा तिच्या बरोबर लाकडी खुर्चीवर बसून कॉफी पित जुन्या स...

THE HALF LOVE STORY 6

आता हे सर्व माझे कल्पित प्रदेश!सत्याशी संबंध लावले तर अपयश तुमच्या पदरी पडेल.जरी सत्य असले तरी मी का मान्य करू?नसले तरी मी का उदोउदो करू?पण एक आहे आकर्षण की प्रेम हे मात्र असत!प्रत्येकालाच….अरे,ते जंगली मांसाहारी प्राणी त्यांच्यात प्राण्याची भूक जागते तर आपण विचारवंत असे महान मानव आहोत!आपल्याकडे त्यासोबत जोडल्या जातात त्या भावना आणि आजवर त्यांच्याच जोरावर सर्व एकत्र आहोत आणि भिन्न!आयुष्यात कोणावर तरी अमर्याद प्रेम करावे आई-वडील,भाऊ,बहीण सोडून. अशी व्यक्ती जिच्यासाठी मरणे पण अगदी क्षुल्लक वाटेल!पण प्रश्न पडतो ती व्यक्ती भेटणे वा सापडण्याचा!समुद्रात मोती सापडण्यासारखे पण मोती भेटतो ना!प्रेम करतात बहुतेक त्यात काहींचे असते वासनेचे तर काहींचे सोज्वळ अंतकरणाचे!काहींमुळे सर्व बदनाम होणे बरे नाही.प्रेम वाईट नाही ती व्यक्ती कशी त्यावरून ते ठरते.कधी कधी सर्वच खऱ्या प्रेम कथा पूर्ण होतात असे नाही ना!वर पाहिलं ना,राहिली ना अपुरी!पण त्यात समाधान आहे.एक अपूर्णत्वाची पूर्णता आहे,ती शोधता यावी.जगात तसे काहीच पूर्ण नाही होत !ज्ञान अपूर्ण असते म्हणून त्याकडे ओढ जास्त आहे तसे प्रेम अपूर्ण राहिले तर...

THE HALF LOVE STORY 5

तस मला हवंच होत!तिला पण हवं असणार ना!उगाच नाही सगळे काम सोडुन माझ्याशी chat करत बसायची!पहाटे चार पर्यंत आमच्या chatting असायच्या कधी कधी दिवस उगवे पर्यंत!वाटायचं राव हे सगळं कॉल वर बोललो तर?किती मस्त ना!पण नशीब गंडलेल अस की माझ्याकडे मोबाईल नाही…म्हणून आमचं बोलणं रात्रीच ते पण पप्पांकडून भेटला मोबाईल तर!  गेले बरेच दिवस आमचं बोलणं एकदम मनमोकळं झालेलं.वाटायचं की एकदा तरी कॉफी डेट वर जाऊ!हेच माझं extreme बजेट होत.ते डिनर, लंच वगैरे म्हणजे आपली लायकीच नाही.साधा चहा,प्राणप्रिय,अमृततुल्य चहा मी पीत नसे.ती तीच बोलायची,मी माझं बोलायचो.बरेच पांचट जोक मारून हसायचो आणि खास म्हणजे ती हसायची.दीड वर्ष मनात घर करून राहिली रे!पण एक दिवस….प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस येतोच….ती कॉलेज सोडून निघून गेली….म्हटलं ना फिल्मी आहे स्टोरी!हे फक्त फिल्म मध्ये होत वाटत ना!जळत्याला विचारा आग,तुम्ही काय विश्वास ठेवणार हो!तुम्ही मुडद्याला खरोखर मेला आहे का याचा जाब विचारता!पण ती भावना अन ते प्रेमात असल्यावर जगणे मात्र खास असत!जगावेगळं असत रे!प्रत्येकाला एक तरी अनुभव यावा!तसे माझ्याकडे वेळ हो...

THE HALF LOVE STORY 4

 आता स्टोरी रिअल फिल्मी….इकडे पण फक्त आवाजावर फिदा झालेलो मी!"excuse me! हे computer चालू कस करतात?"वाह काय अदाकारी होती तिच्या आवाजात,विचारण्यात…काय ती नाजूकता!काय ते माधुर्य आवाजात!गाणे गात नसली तरी सुमधुर आणि इतका की कानापासून थेट हृदयात…शेजारच्या खुर्चीवर होती पण कधी हिंमत नाही झाली बघण्याची!मनात दुर्दम्य इच्छा की यार बघू का?पण पाहिल्यावर….ठरकी साला!वासनेचा पुजारी, कामदेवाचा भक्त अन काय नाही ते ते ते…मी चांगला आहे मला माहित आहे पण जगाला खास करून तिला नाही ना माहीत!(गेलं दीड वर्ष तीच माझं जग होती!)माझ्याकडे मुलींशी मैत्री नाही होत एकतर बहीण होते नाही तर डायरेक्ट लग्नाच्या जोड्यात नटलेली वधू जी यज्ञमंडपात माझ्या घोडीवरून नाचत गाजत येण्याची वाट बघत असेल!माझ्यापुढे कोणती पण सुंदर….सुंदर बर का!मुलगी आणा तिला मी जोड्यात कशी दिसेल सांगेल…नजर राव,दृष्टी!नंतर कळलं की वाह!एकच क्लास आमचा!प्रॅक्टिकल बॅच एकच!रोल नंबर मागे पुढे!आणि पेपरला माझ्या जवळ!झाला इथेच लोचा झाला!पहिल्या त्या आवाजाने तरी थोडासा प्रेमात असेल पण यार दिवसातील दोन तास तर पक्की माझ्यापाशी ती असणार ना!आणि आम्ही काय गप...

THE HALF LOVE STORY 3

नंतर मध्यंतरी आमच्या सुकलेल्या नजरेला हिरवळ दिसावी तस झालेल!पण अस होत ना प्रेमात पडायच्या आत काही तरी विचित्र,विक्षिप्त घडायचं,दिसायचं …नाही तर आजवर मी हजाराच्या वर पोरींच्या प्रेमात पडलेलो.म्हणायला त्यातल्या काही म्हणजे सगळ्याच बहिणी झाल्या तो भाग वेगळा!बारावीला असताना क्लासेसला जुळलं ते दुसरं प्रेम!फक्त नजरेचा वार पुरा होता मला लुटायला!मी आजवर तिचा सुद्धा चेहरा पाहिला नाही फक्त डोळे बाकी ते…पण चंदनाच्या वनात एखादी मृगमयी नजरेची जलपरी सगळा आसमंत आपल्या चेहऱ्यावर अगदी नाजूकतेने माळलेल्या दोन समुद्रात साठवावे असे ते शीतल प्रखर तेज आणि त्याच्या वर उंच उंच अशा रेखीव डोंगर रंगांसारख्या भुवया जेथून आताच एखादा बाण नजरेच्या सागरातल्या जहालतेत डुंबून माझ्याकडे कूच करेल आणि मी विचार न करता तिच्यापुढे दोन्ही हात पसरून नजरांना तिच्या नजरेत रोखत झेलेल आणि नंतर फक्त एक निनावी प्रेमगीत वाजत राहील!एकच धून!एकच राग आणि शेवटी एकच श्वास!मनात माझ्या अंतापर्यंत…..पण राव काही दिवसांनी कळलं तीच दुसरीकडे चालू होतं आणि पोरगी पण चालू होती!म्हणजे आपल्याकडे असे(ऐकले असेल)गाडी बिघडली की बंद आणि मुलगी बिघडली तर …....

THE HALF LOVE STORY 2

तरी विषय होता मुली,मी आणि प्रेम!कधी बारावी पर्यंत कोणत्या मुलीसोबत बोललो नाही!पण आकर्षण जबरदस्त!वाटायचं राव,आपली पण एखादी खास मैत्रीण असावी!जीच्यासोबत आपण मनमोकळे बोलू,खेळू अन काय काय नाही ते स्वप्नांचे मनोरे.वर नका जाऊ जास्त,जमिनीवर या!हे मनोरे काय तसले आणि तितके उंच नव्हते;कारण आम्ही स्वभाव वा मनाच्या प्रेमात पडणारे मूल नाही आहोत!आम्ही प्रेमात पडतो सुंदरतेच्या!चेहरा,रंग….जाऊद्या आता सगळं नाही सांगत!घ्या समजून….एकाच माळीचे मनी ना आपण!चौथी पर्यंत मूल मुली आम्ही एकत्र आराधरी,विष अमृत सगळं खेळायचो!म्हणजे आमचं हे अति होत पण पाचवीला आलो आणि सगळं 180° मध्ये फिरलं.एक पण मुलगा एका पण मुलीशी बोलत नसे.तर बाबू मोशाय हम किस खेत की मुली….त्यात आमच्याकडे दुष्काळ!मुली होत्या रे पण म्हणतात ना एक आदर्श क्रश सारख कोणी नव्हतं!चौथी पर्यंत घरचे मुलीच्या नावाने चिडवायचे ते पण दोन दोन….कळत नव्हतं ना तेव्हा!म्हणून नाही तर आता म्हणा बर….? आठविला असताना झालं ते पहिलं प्रेम ते पण कधी मी तिला पाहिले नाही!काय मूर्ख माणूस आहे हा!आला ना विचार मनात….अरे राव!लैला मजनू,हिर रांजा,रोमियो जुलेट, महेश……. पळ मी नावच नाही ...

THE HALF LOVE STORY 1

प्रत्येकाला स्टोरीझ असतात ना!माझ्या पण भरपूर आहेत.कोणती ऐकवू मग?मला माहितीय कोणती हवीय!सांगू?एखादी दर्दी अन अपूर्ण लव स्टोरी….हो ना?नाही नका म्हणू आता,मी पण तुमच्यातील एक!मी पण एन्जॉय करत असतो अशा सो कॉल्ड लव स्टोरीझ….स्टोरी !हाल्फ लव स्टोरीझ!  सो,प्रत्येकाला वाटत,'यार आयुष्यात काही तरी थ्रिल असावं!(ज्याला वाटत नाही त्याने कोरडी विहीर बघून जीव दिला तरी कोणाच्या आयुष्यातून काही जाणार नाही,मेलेल्या माणसाला कोणी जास्त लक्षात ठेवत नाही ना!)'मग ते थ्रिल कधी मैत्रीत येत तर कधी तरी काही तरी उनाडकी करण्यात.काहींना ते कोठे कोठे मिळेल ते तर अवघडच!मला पण वाटलेलं 'अपने लाईफ मे कुछ तो खतरनाक, जबर,इंटरेस्टिंग होना तो मंगता है!'मग काय झालं…पण वेळ घेऊन…आणि ते म्हणजे प्रेम ते पण अशा मुलीवर जिच्यासाठी……जाऊदे रे!काय जून उकरून काढायचं….. म्हणजे ती काही पहिली मुलगी नाही जिच्या प्रेमात मी पडलो असेल!(पडल्यावर लागत का रे,प्रेमात?)सुरवातीपासून मुलींबाबत मनात वेगळी ओढ!आपल्या पेक्षा ह्या वेगळ्या का?ह्यांना वेगळी वागणूक का?घरात बहीण आहे धाकली आणि तिच्या चुकांना मला शिक्षा का?एकच चुकी पण तिला जर ए...