THE HALF LOVE STORY 6

आता हे सर्व माझे कल्पित प्रदेश!सत्याशी संबंध लावले तर अपयश तुमच्या पदरी पडेल.जरी सत्य असले तरी मी का मान्य करू?नसले तरी मी का उदोउदो करू?पण एक आहे आकर्षण की प्रेम हे मात्र असत!प्रत्येकालाच….अरे,ते जंगली मांसाहारी प्राणी त्यांच्यात प्राण्याची भूक जागते तर आपण विचारवंत असे महान मानव आहोत!आपल्याकडे त्यासोबत जोडल्या जातात त्या भावना आणि आजवर त्यांच्याच जोरावर सर्व एकत्र आहोत आणि भिन्न!आयुष्यात कोणावर तरी अमर्याद प्रेम करावे आई-वडील,भाऊ,बहीण सोडून. अशी व्यक्ती जिच्यासाठी मरणे पण अगदी क्षुल्लक वाटेल!पण प्रश्न पडतो ती व्यक्ती भेटणे वा सापडण्याचा!समुद्रात मोती सापडण्यासारखे पण मोती भेटतो ना!प्रेम करतात बहुतेक त्यात काहींचे असते वासनेचे तर काहींचे सोज्वळ अंतकरणाचे!काहींमुळे सर्व बदनाम होणे बरे नाही.प्रेम वाईट नाही ती व्यक्ती कशी त्यावरून ते ठरते.कधी कधी सर्वच खऱ्या प्रेम कथा पूर्ण होतात असे नाही ना!वर पाहिलं ना,राहिली ना अपुरी!पण त्यात समाधान आहे.एक अपूर्णत्वाची पूर्णता आहे,ती शोधता यावी.जगात तसे काहीच पूर्ण नाही होत !ज्ञान अपूर्ण असते म्हणून त्याकडे ओढ जास्त आहे तसे प्रेम अपूर्ण राहिले तर ओढ असणार ना!देव भेटल्यावर आपण त्याला पुजणे सोडून देणारे लोक प्रेम पूर्णता भेटले तर…..काही गोष्टी असतात,कर्तव्य,हक्क ते निभवायचे असतात.कधी आपल्यासाठी तर कधी दुसऱ्यासाठी राहतात रे काही प्रेम कहाण्या अपूर्ण…राधाकृष्ण काही अपवाद का?पण त्यांची प्रेमकथा अमर झाली.आपली पण होऊ शकते ना!की फक्त एकमेकांच्या नावाने चिडवण्या इतपत आपली प्रेम कहाणी आहे?नसेल,माहीत आहे!पण मग एकदा विचारून बघा!विचारून पचतावलेलं बरे न विचारून पस्तावण्यापेक्षा!आयुष्य आहे रे,वर खाली, मागेपुढे होणार ना!पण भावना नको वागायला अशा!प्रेम कोणावर कसे पण आणि कधीही होऊ शकत!ओळखता आणि निभावता आले पाहिजे!हो आणि अजुन एक पुन्हा नवीन अधुऱ्या राहणाऱ्या प्रेम कहाणीत माझा प्रवास सुरु झाला आज बर का!मला आनंद आहे त्याचा,दुःख नाही.अपूर्णता आवडते रे आता …सवय झाली प्रवासाच्या मंजिल पेक्षा…

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

एक इंजिनीअर

उगाच...