स्वप्नातला समुद्र

प्नातला समुद्र....
शांत असा गार वारा वाहत असेन त्याला नारळाची झाड साद घालत असतीन .लाटांचा तो हवाहवासा वाटणारा आवाज कानी पडत असेन .ती आणि मी समुद्र किनारी मृदू वाळूत बसलेलो .एक टेबल दोन खुर्च्या तिथे ती आणि मी दुसर कोणीच नाही त्या टेबल वर एक मेणबत्ती जळत असेन त्यात ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे पाहत बसलेलो ...त्या मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तिची सोनेरी कांती आणखीनच उजळ भासेन ...तिला मी आणि मला ती पाहण्यात पूर्णपणे हरवलेलो असेन....तेव्हाच हळूच एक थंड गार वाऱ्याची झुळूक आम्हा दोघांना स्पर्शून जाईन ..आणि अंगावर ते हवेहवे से वाटणारे मखमली शहारे येतील ...आणि अशातच कुठेतरी मनाला भुलवणार छान स गाणं ऐकू यावं आणि ते ऐकतच मी तिच्या प्रेमात पुन्हा पडावं...तिचा हात हातात घ्यावा आणि तिच्या डोळ्यात पाहतच राहावं ....तो क्षण तिथेच कैद व्हावा आणि त्या क्षणातच मी तिच्याबरोबर पूर्ण आयुष्य जगावं ...ती रात्र सरूच नये खूप बोलायचं तिच्याशी ........... दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके ..!!!

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

एक इंजिनीअर

उगाच...