THE HALF LOVE STORY 5
तस मला हवंच होत!तिला पण हवं असणार ना!उगाच नाही सगळे काम सोडुन माझ्याशी chat करत बसायची!पहाटे चार पर्यंत आमच्या chatting असायच्या कधी कधी दिवस उगवे पर्यंत!वाटायचं राव हे सगळं कॉल वर बोललो तर?किती मस्त ना!पण नशीब गंडलेल अस की माझ्याकडे मोबाईल नाही…म्हणून आमचं बोलणं रात्रीच ते पण पप्पांकडून भेटला मोबाईल तर! गेले बरेच दिवस आमचं बोलणं एकदम मनमोकळं झालेलं.वाटायचं की एकदा तरी कॉफी डेट वर जाऊ!हेच माझं extreme बजेट होत.ते डिनर, लंच वगैरे म्हणजे आपली लायकीच नाही.साधा चहा,प्राणप्रिय,अमृततुल्य चहा मी पीत नसे.ती तीच बोलायची,मी माझं बोलायचो.बरेच पांचट जोक मारून हसायचो आणि खास म्हणजे ती हसायची.दीड वर्ष मनात घर करून राहिली रे!पण एक दिवस….प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस येतोच….ती कॉलेज सोडून निघून गेली….म्हटलं ना फिल्मी आहे स्टोरी!हे फक्त फिल्म मध्ये होत वाटत ना!जळत्याला विचारा आग,तुम्ही काय विश्वास ठेवणार हो!तुम्ही मुडद्याला खरोखर मेला आहे का याचा जाब विचारता!पण ती भावना अन ते प्रेमात असल्यावर जगणे मात्र खास असत!जगावेगळं असत रे!प्रत्येकाला एक तरी अनुभव यावा!तसे माझ्याकडे वेळ होता पण कळला नाही!कधी कधी स्वतःच्या चुका आपण स्वतः वेगळ्या प्रकारे भोगतो.आज पण प्रश्न पडतो तेव्हा विचारलं असत तर?
Comments
Post a Comment