THE HALF LOVE STORY 1
प्रत्येकाला स्टोरीझ असतात ना!माझ्या पण भरपूर आहेत.कोणती ऐकवू मग?मला माहितीय कोणती हवीय!सांगू?एखादी दर्दी अन अपूर्ण लव स्टोरी….हो ना?नाही नका म्हणू आता,मी पण तुमच्यातील एक!मी पण एन्जॉय करत असतो अशा सो कॉल्ड लव स्टोरीझ….स्टोरी !हाल्फ लव स्टोरीझ! सो,प्रत्येकाला वाटत,'यार आयुष्यात काही तरी थ्रिल असावं!(ज्याला वाटत नाही त्याने कोरडी विहीर बघून जीव दिला तरी कोणाच्या आयुष्यातून काही जाणार नाही,मेलेल्या माणसाला कोणी जास्त लक्षात ठेवत नाही ना!)'मग ते थ्रिल कधी मैत्रीत येत तर कधी तरी काही तरी उनाडकी करण्यात.काहींना ते कोठे कोठे मिळेल ते तर अवघडच!मला पण वाटलेलं 'अपने लाईफ मे कुछ तो खतरनाक, जबर,इंटरेस्टिंग होना तो मंगता है!'मग काय झालं…पण वेळ घेऊन…आणि ते म्हणजे प्रेम ते पण अशा मुलीवर जिच्यासाठी……जाऊदे रे!काय जून उकरून काढायचं….. म्हणजे ती काही पहिली मुलगी नाही जिच्या प्रेमात मी पडलो असेल!(पडल्यावर लागत का रे,प्रेमात?)सुरवातीपासून मुलींबाबत मनात वेगळी ओढ!आपल्या पेक्षा ह्या वेगळ्या का?ह्यांना वेगळी वागणूक का?घरात बहीण आहे धाकली आणि तिच्या चुकांना मला शिक्षा का?एकच चुकी पण तिला जर एक छडी प्रेमाची तर आमच्या ढुंगणावर दहा लाथाच का?शाळेत असताना अभ्यास अपूर्ण असताना मुलीला प्रेमाने समजवून सांगून मुलांची एक एक पाकळी सुजे पर्यंत बेदम धोपटने का?आम्ही काही वेगळ्या ठिकाणाहून जन्माला आलो का?पोटातच वाढलो की एखाद्या कचरा कुंडीतून उचलून अनावश्यक अस वागवतात?त्यात त्यांच्या ह्या वागणुकीला शब्द सुद्धा विचारू शकत नाही,विचारलं तर पोरग उद्धट हो!संस्कार नाही!त्यात आम्ही म्हणजे घंटा!कोणी पण येत मारून जात!नातेवाईक,शिक्षक,पालक हे कमी होत का शाळेतील शिपडे,मित्रांचे घरचे सगळेच सराईत घोडे लावून जायचे हो!कधी कधी प्रश्न पडायचा जर का गरोदर झालो तर बाळाच्या बापाचं नाव काय?इतका विचार नका करू,कसला हा अभद्र पोरगा!अश्लील बोलतो!मी अजून पण आई,वडिलांवरून कोणाला शिवी दिली नाही वा ऐकत नाही!उगाच त्यांचा आपल्यामुळे उद्धार कशाला?हे असं होतं…भाग्या भाग्या कितना भाग्या सारख!तस मुलींबाबत मनात वेगळाच राग आहे पण सगळ्यांवर नाही...जरी भारत माझा देश असला तरी सगळे माझे बांधव कसे असणार?कोणी तरी ती पण असेल ना!म्हणून यार प्रतिज्ञा बदला ना!असा मला आजार आहे मुलींना बहीण बनवण्याचा....गिनीज बुक मध्ये नाव द्यावं की काय?
Comments
Post a Comment