THE HALF LOVE STORY 2
तरी विषय होता मुली,मी आणि प्रेम!कधी बारावी पर्यंत कोणत्या मुलीसोबत बोललो नाही!पण आकर्षण जबरदस्त!वाटायचं राव,आपली पण एखादी खास मैत्रीण असावी!जीच्यासोबत आपण मनमोकळे बोलू,खेळू अन काय काय नाही ते स्वप्नांचे मनोरे.वर नका जाऊ जास्त,जमिनीवर या!हे मनोरे काय तसले आणि तितके उंच नव्हते;कारण आम्ही स्वभाव वा मनाच्या प्रेमात पडणारे मूल नाही आहोत!आम्ही प्रेमात पडतो सुंदरतेच्या!चेहरा,रंग….जाऊद्या आता सगळं नाही सांगत!घ्या समजून….एकाच माळीचे मनी ना आपण!चौथी पर्यंत मूल मुली आम्ही एकत्र आराधरी,विष अमृत सगळं खेळायचो!म्हणजे आमचं हे अति होत पण पाचवीला आलो आणि सगळं 180° मध्ये फिरलं.एक पण मुलगा एका पण मुलीशी बोलत नसे.तर बाबू मोशाय हम किस खेत की मुली….त्यात आमच्याकडे दुष्काळ!मुली होत्या रे पण म्हणतात ना एक आदर्श क्रश सारख कोणी नव्हतं!चौथी पर्यंत घरचे मुलीच्या नावाने चिडवायचे ते पण दोन दोन….कळत नव्हतं ना तेव्हा!म्हणून नाही तर आता म्हणा बर….? आठविला असताना झालं ते पहिलं प्रेम ते पण कधी मी तिला पाहिले नाही!काय मूर्ख माणूस आहे हा!आला ना विचार मनात….अरे राव!लैला मजनू,हिर रांजा,रोमियो जुलेट, महेश……. पळ मी नावच नाही सांगणार…यात मज्जा रे…नाव सांगितलं की स्टोरी पूर्ण व्हायची भीती ना!आमच्याच वर्गातील दोन मुलं तिच्या साठी वेडे झालेले म्हणून तीच नाव सारख ऐकू यायचं.त्यात तिच्या डेरिंग चे पण किस्से ऐकू आले…म्हणजे दुष्काळी भागात रिकामा टँकर यावा तरी लोक खुश होतात ना तसा मी!मग काय पडलो प्रेमात पण इतकं खोल नाही!दहावी होई पर्यंत फक्त तिचे नाव माहीत पण चेहरा वगैरे नाही माहीत!दहावी गेली अन ती ही गेली बहुतेक...आणि ते दोन मित्र परम शत्रू.....छे!अजून घट्ट मित्र झाले...आता कोण कोणती पटवतो हे चेक करतात एकच असेल तर टॉस करतात...
Comments
Post a Comment