THE HALF LOVE STORY 4

 आता स्टोरी रिअल फिल्मी….इकडे पण फक्त आवाजावर फिदा झालेलो मी!"excuse me! हे computer चालू कस करतात?"वाह काय अदाकारी होती तिच्या आवाजात,विचारण्यात…काय ती नाजूकता!काय ते माधुर्य आवाजात!गाणे गात नसली तरी सुमधुर आणि इतका की कानापासून थेट हृदयात…शेजारच्या खुर्चीवर होती पण कधी हिंमत नाही झाली बघण्याची!मनात दुर्दम्य इच्छा की यार बघू का?पण पाहिल्यावर….ठरकी साला!वासनेचा पुजारी, कामदेवाचा भक्त अन काय नाही ते ते ते…मी चांगला आहे मला माहित आहे पण जगाला खास करून तिला नाही ना माहीत!(गेलं दीड वर्ष तीच माझं जग होती!)माझ्याकडे मुलींशी मैत्री नाही होत एकतर बहीण होते नाही तर डायरेक्ट लग्नाच्या जोड्यात नटलेली वधू जी यज्ञमंडपात माझ्या घोडीवरून नाचत गाजत येण्याची वाट बघत असेल!माझ्यापुढे कोणती पण सुंदर….सुंदर बर का!मुलगी आणा तिला मी जोड्यात कशी दिसेल सांगेल…नजर राव,दृष्टी!नंतर कळलं की वाह!एकच क्लास आमचा!प्रॅक्टिकल बॅच एकच!रोल नंबर मागे पुढे!आणि पेपरला माझ्या जवळ!झाला इथेच लोचा झाला!पहिल्या त्या आवाजाने तरी थोडासा प्रेमात असेल पण यार दिवसातील दोन तास तर पक्की माझ्यापाशी ती असणार ना!आणि आम्ही काय गप बसणारे संस्कारी पोर नव्हतो!बोलणं होतच!तिला computer येत नव्हतं मला यायचं.हा माझा strongest weak point ना!हळूच मला म्हणायची ,'एवढं करून दे ना!'अन मी मूर्ख,महामुर्ख आता किती शिव्या घालाव्या तो हसत हसत करून द्यायचो.ते पाहून बाकीच्या मुली पण तेच…पण माझं प्रेम तिच्यावर होत त्यांच्यावर नाही.म्हणून टाळायचो आणि त्याचा अर्थ सगळ्यांनी असा घेतला की आमचं नक्कीच गोटम्याट चालू आहे!

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

एक इंजिनीअर

उगाच...