THE HALF LOVE STORY 3
नंतर मध्यंतरी आमच्या सुकलेल्या नजरेला हिरवळ दिसावी तस झालेल!पण अस होत ना प्रेमात पडायच्या आत काही तरी विचित्र,विक्षिप्त घडायचं,दिसायचं …नाही तर आजवर मी हजाराच्या वर पोरींच्या प्रेमात पडलेलो.म्हणायला त्यातल्या काही म्हणजे सगळ्याच बहिणी झाल्या तो भाग वेगळा!बारावीला असताना क्लासेसला जुळलं ते दुसरं प्रेम!फक्त नजरेचा वार पुरा होता मला लुटायला!मी आजवर तिचा सुद्धा चेहरा पाहिला नाही फक्त डोळे बाकी ते…पण चंदनाच्या वनात एखादी मृगमयी नजरेची जलपरी सगळा आसमंत आपल्या चेहऱ्यावर अगदी नाजूकतेने माळलेल्या दोन समुद्रात साठवावे असे ते शीतल प्रखर तेज आणि त्याच्या वर उंच उंच अशा रेखीव डोंगर रंगांसारख्या भुवया जेथून आताच एखादा बाण नजरेच्या सागरातल्या जहालतेत डुंबून माझ्याकडे कूच करेल आणि मी विचार न करता तिच्यापुढे दोन्ही हात पसरून नजरांना तिच्या नजरेत रोखत झेलेल आणि नंतर फक्त एक निनावी प्रेमगीत वाजत राहील!एकच धून!एकच राग आणि शेवटी एकच श्वास!मनात माझ्या अंतापर्यंत…..पण राव काही दिवसांनी कळलं तीच दुसरीकडे चालू होतं आणि पोरगी पण चालू होती!म्हणजे आपल्याकडे असे(ऐकले असेल)गाडी बिघडली की बंद आणि मुलगी बिघडली तर …. बारावी सुटली ती पण सुटली आणि साधा तीच कोठे तुटल्यावर जुळवण्यासाठी नंबर मागता नाही आला.मी तर फट्टू होतोच आणि माझी अक्षरशः…..जाऊद्या ना राव!काळजाला लै रुतत रे!पण आलो इथं पर्यंत तर शेवटचा किस्सा!घरच्यांची कृपा म्हणून इंजिनिअरिंग भेटली आणि स्वाहा!आयुष्याचा भस्मासुर व्हावा आणि आपण त्यात हसून जळत जावं अस प्रेम घडलं!तेव्हापासून पोरींशी संपर्क वाढला…..तसा नाही रे!अजून महेश आव्हाड नाव विचारलं ना कॉलेज मध्ये तर म्हणतील तो सगळ्या मुलींना बहीण बनवणारा!एकदा बस मध्ये एकच सीट खाली होती त्यावर मुलगी बसलेली.मी तिला म्हटलो सगळ्या संस्कारासहित,"ताई जरा सरकते का?"ती सरकली तर नाही पण तिची सरकली नक्की होती!नाही तर उगाच पाऊण तास मी उभा आणि रिकाम्या जागेवर स्वतःची बॅग ठेवून माझ्याकडे म्हशी सारखी बघत होती….
Comments
Post a Comment