MY FANTASY
मला एक अशी व्यक्ती हवीये जी माझ्या सारखी crazy..प्रसंगी कठोर तरी हळव्या मनाची ......ध्येय वगैरे अशा जड शब्दांच्या मागे लागून आयुष्य वाया न घालवणारी ....भविष्याचा विचार न करता त्या क्षणाचा आनंद लुटणारी .कारण कोण किती जगणारे कुणाला ठाउकें...एकदा तिच्या सोबत जग फिरायला जायचंय ... कुठली planning नाही ना कुठे जायचं हे हि माहित नाही ..फक्त बॅग उचलायची ,गाडीला किक मारायची आणि रास्ता जाईल तिकड़े जायचं.. फक्त ती सोबत हवी..तिच्याबरोबर त्या पहिल्या पावसातील पहिली सर अनुभवायचीये ..तिच्यासोबतचा तो पहिला मातीचा गंध आयुष्यभरासाठी उरी साठवून ठेवायचाय... पावसात तिच्या हातांचा होणार स्पर्श प्रत्येक पावसाळ्यात अनुभवायचाय .इतकच नाही तर तिच्या बरोबर वेड्या सारखं नाचायचंय आणि तिच्या बरोबर म्हातारही व्हायचंय . उतार वयात एकांतात सगळ्या जगापासून दूर कुठे तरी समुद्रा किनारी राहायचंय...तिथे फक्त मी माझ्या कविता शांत समुद्र आणि ती...समुद्रा किनाऱ्याच्या दगडांवर बसून पाय पाण्यात घालून तासन तास तिच्याशी गप्पा मारायच्यात...सांजवेळी मंद गार वारा वाहत असेन तेव्हा तिच्या बरोबर लाकडी खुर्चीवर बसून कॉफी पित जुन्या सगळ्या आठवणी ताज्या करायच्यात आणि हसायचंय खळखळून अगदी मनसोक्त ....
Comments
Post a Comment