Posts

चला थोडं आठवणीत रमू....

तस मागे वळून पाहिलं की खूपदा आठवणी आपल्याला बोलवताना दिसतात, आता या तिच्या आठवणी नाहीयत, पण नक्कीच आपल्या सर्वांच्या आठवणी आहेत. कधीतरी एकांतात अस मागे वळून, मनाच्या डोहात आतवर जाऊन प्रत्येकाने ती आठवणींचे शिंपले नक्की उघडून पाहावेत.  आजही आठवत मला जेंव्हा हाफ पॅन्ट घालून आम्ही सगळे शाळेत जायचो, बेंच वर रेषा मारून आपआपल्या हिस्स्यावर मालकी गाजवायचो. चालू तासाला जलजीरा चाटायला जी मजा यायची ती महागातल्या कॅफेत सुद्धा मिळणार नाही. शाळा सुटली का उनाड भटकत फिरायच, कडक ऊन असलं की एखाद्या मित्राच्या घरी निवांत झोपायच. आणि हो ते पत्र्यावर चढून टीव्हीचा अँटेना ठीक करणं एक साहसी काम असायचं. काळ्या पांढऱ्या पटावर येणाऱ्या मुंग्या मात्र खडू मारून सुद्धा जायच्या नाहीत, कुरापती करून कधी कधी दुसऱ्याच्या केबल चे चॅनेल मात्र ढापता यायचे. आधी पत्रात मस्त गोड गोड पापे मिळायचे, रक्षाबंधनला राखी सोबत साखरेचे कणही चिटकून यायचे. कधी फोन आलाच कुणाचा तर शेजारच्या काकू कडे यायचा, नाहीतर STD मधून किंमत देऊन लावायचा. आम्ही आहोत त्या जमान्यात जन्मलेले ज्याने मोबाइल फोनची पूर्ण उत्क्रांती बघितलीय, काळ्या पांढऱ...

उगाच...

उगाच हेडफोन घालून अरजित, जगजीत ऐकत बसून ब्रेकअप वाली पण फिलिंग घेऊन बघावी.जरा कमी पण कोणाची तरी आठवण काढून नाजूक smile चेहऱ्यावर खुलून द्यायची,घरच्यांना वाटलं पाहिजे येड झालं ते.कधी तरी उगाच clg ला जाऊन lecture नाही करायचे.बसायचं कोठे तरी झाडाखाली,कॅन्टीन मध्ये कोठे तरी शांतपणे एकटक बघत.उगाच आठवून बघायचा कोणाचा तरी चेहरा,उगाच कडक ऊन असताना पावसात भिजल्याची फील घेत बसायचं.रूममध्ये एकट असेल तर वेड्यागत गायचं,नाचायच जरी नसल जमत.उगाच भरभरून बोलायच कोणाशी तरी उगाच रागवायच,काही तरी बरमळत बसायचं.कोणाकडे तरी बघून उगाच हसायचं...लहान मुलाचा फुगा फोडून पळायचं... काही तरी चोरून दुसऱ्यांना वाटत बसायचं...निर्जिवांशी बोलत बसायचं.हसायचं,खेळायचं जे वाटेल ते करायचं.....येड म्हटलं तर क्षणिक.... कविता करण्यापेक्षा तरी बरच असत रे!

असेही एकदा व्हावे

असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जुने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस आपण आठवतो त्यात हा पहिला असतो आपण त्या दिवसामध्ये किती मस्ती मज्जा करत असायचो. ते दिवस पण काय होते जिथे कमी बंधने होती आणि लाड जास्त होत असायचे जास्त आणि चूक जर झाली तर मार पडायचा पण त्यात प्रेम पण असायचे. ते दिवस असे आहे ते जगण्यासाठी मी आत्ता त्या वेळेत जाऊ शकतो. कारण त्या वेळेमध्ये ना मोबाईल, टीव्ही, ना प्ले स्टेशन नाही व्हॉटसअप आणि फेसबुक सुद्धा पण लहान होण्याचा जास्त फायदा होता लाड जास्त होत असतात आपले पण सर्वात जास्त लाड एकाचे होतात ज्या घरामध्ये सर्वात लहान जो असायचा त्याचा लाड खूप जास्त होत असतो. ते जाऊद्या पण लहान पणाची काय मज्जा होती काही सकाळी लवकर उठणे तयार होणे, पूजा करणे, शाळा दुपारची असल्यामुळे आपण थोडे लेट उठयाचो पण काहीची शाळा सकाळी होती त्यांना जर लवकर उठावे लागत होते. घरी वापस आले की आपण आपला अभ्यास करून कारण...

LIFE MEANS WHAT....?

1.रात्री च एकटाच long drive ला निघालेलो ....सोबत गार वारा ...आणि हेड फ़ोन मध्ये अरिजित सिंग ची गाणी ...... 2.रात्रीं 1 ची वेळ हातात गरमागरम चहाचा कप ....मी आणि ती balcony मध्ये थांबलेलो ...मंद असा गार वारा वाहत असेन ...तिने घट्ट असा दोन्ही हाताने चहाचा कप धरून ठेवला असेन...आणि आमच्या कॉलेज च्या गप्पा चालू असतील कि मी किती मूर्ख होतो आधी...... 3.एक गाडी ..मोकळा रस्ता...गाडीत फक्त ती आणि मी ..रात्रीची वेळ... खिडकीतून तिचे केस उडवत येणारा गार वारा...आमच्या दोघातील ती शांतता ...... .आणि त्या क्षणी मी रेडिओ लावावा ...आणि लग जा गले हे गाणं लागावं ...आणि आम्ही दोघे हि एकमेकांकडे बघून हसावं ... 4.रात्र झालेली असेन ...बाहेर गुलाबी थंडी ..आणि रोड वर ती आणि मी दोघेच ...गप्पा मारत एक long walk ला चाललेलो ...आणि अचानक चहाची टपरी दिसावी... 5.मी कॉलेज ला जात असावो ...पाऊस येत असावा ...मी छत्री घेऊन चालत असावो..आणि तिची छत्री विसरली म्हणून अचानक ती छत्री मध्ये यावी ... 5. लग्न झाल्यावर ....एक दिवस मी kitchen वट्ट्यावर बसलेलो असावो ...ती चपात्या लाटत असेन....आणि मी तिला तिच्यावरच्या सगळ्या कविता ऐकवत अ...

स्वप्नातला समुद्र

प्नातला समुद्र.... शांत असा गार वारा वाहत असेन त्याला नारळाची झाड साद घालत असतीन .लाटांचा तो हवाहवासा वाटणारा आवाज कानी पडत असेन .ती आणि मी समुद्र किनारी मृदू वाळूत बसलेलो .एक टेबल दोन खुर्च्या तिथे ती आणि मी दुसर कोणीच नाही त्या टेबल वर एक मेणबत्ती जळत असेन त्यात ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे पाहत बसलेलो ...त्या मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तिची सोनेरी कांती आणखीनच उजळ भासेन ...तिला मी आणि मला ती पाहण्यात पूर्णपणे हरवलेलो असेन....तेव्हाच हळूच एक थंड गार वाऱ्याची झुळूक आम्हा दोघांना स्पर्शून जाईन ..आणि अंगावर ते हवेहवे से वाटणारे मखमली शहारे येतील ...आणि अशातच कुठेतरी मनाला भुलवणार छान स गाणं ऐकू यावं आणि ते ऐकतच मी तिच्या प्रेमात पुन्हा पडावं...तिचा हात हातात घ्यावा आणि तिच्या डोळ्यात पाहतच राहावं ....तो क्षण तिथेच कैद व्हावा आणि त्या क्षणातच मी तिच्याबरोबर पूर्ण आयुष्य जगावं ...ती रात्र सरूच नये खूप बोलायचं तिच्याशी ........... दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके ..!!!

MY FANTASY

मला एक अशी व्यक्ती हवीये जी माझ्या सारखी crazy..प्रसंगी कठोर तरी हळव्या मनाची ......ध्येय वगैरे अशा जड शब्दांच्या मागे लागून आयुष्य वाया न घालवणारी ....भविष्याचा विचार न करता त्या क्षणाचा आनंद लुटणारी .कारण कोण किती जगणारे कुणाला ठाउकें...एकदा तिच्या सोबत जग फिरायला जायचंय ... कुठली planning नाही ना कुठे जायचं हे हि माहित नाही ..फक्त बॅग उचलायची ,गाडीला किक मारायची आणि रास्ता जाईल तिकड़े जायचं.. फक्त ती सोबत हवी..तिच्याबरोबर त्या पहिल्या पावसातील पहिली सर अनुभवायचीये ..तिच्यासोबतचा तो पहिला मातीचा गंध आयुष्यभरासाठी उरी साठवून ठेवायचाय... पावसात तिच्या हातांचा होणार स्पर्श प्रत्येक पावसाळ्यात अनुभवायचाय .इतकच नाही तर तिच्या बरोबर वेड्या सारखं नाचायचंय आणि तिच्या बरोबर म्हातारही व्हायचंय . उतार वयात एकांतात सगळ्या जगापासून दूर कुठे तरी समुद्रा किनारी राहायचंय...तिथे फक्त मी माझ्या कविता शांत समुद्र आणि ती...समुद्रा किनाऱ्याच्या दगडांवर बसून पाय पाण्यात घालून तासन तास  तिच्याशी गप्पा मारायच्यात...सांजवेळी मंद गार वारा वाहत असेन तेव्हा तिच्या बरोबर लाकडी खुर्चीवर बसून कॉफी पित जुन्या स...

THE HALF LOVE STORY 6

आता हे सर्व माझे कल्पित प्रदेश!सत्याशी संबंध लावले तर अपयश तुमच्या पदरी पडेल.जरी सत्य असले तरी मी का मान्य करू?नसले तरी मी का उदोउदो करू?पण एक आहे आकर्षण की प्रेम हे मात्र असत!प्रत्येकालाच….अरे,ते जंगली मांसाहारी प्राणी त्यांच्यात प्राण्याची भूक जागते तर आपण विचारवंत असे महान मानव आहोत!आपल्याकडे त्यासोबत जोडल्या जातात त्या भावना आणि आजवर त्यांच्याच जोरावर सर्व एकत्र आहोत आणि भिन्न!आयुष्यात कोणावर तरी अमर्याद प्रेम करावे आई-वडील,भाऊ,बहीण सोडून. अशी व्यक्ती जिच्यासाठी मरणे पण अगदी क्षुल्लक वाटेल!पण प्रश्न पडतो ती व्यक्ती भेटणे वा सापडण्याचा!समुद्रात मोती सापडण्यासारखे पण मोती भेटतो ना!प्रेम करतात बहुतेक त्यात काहींचे असते वासनेचे तर काहींचे सोज्वळ अंतकरणाचे!काहींमुळे सर्व बदनाम होणे बरे नाही.प्रेम वाईट नाही ती व्यक्ती कशी त्यावरून ते ठरते.कधी कधी सर्वच खऱ्या प्रेम कथा पूर्ण होतात असे नाही ना!वर पाहिलं ना,राहिली ना अपुरी!पण त्यात समाधान आहे.एक अपूर्णत्वाची पूर्णता आहे,ती शोधता यावी.जगात तसे काहीच पूर्ण नाही होत !ज्ञान अपूर्ण असते म्हणून त्याकडे ओढ जास्त आहे तसे प्रेम अपूर्ण राहिले तर...