उगाच...
उगाच हेडफोन घालून अरजित, जगजीत ऐकत बसून ब्रेकअप वाली पण फिलिंग घेऊन बघावी.जरा कमी पण कोणाची तरी आठवण काढून नाजूक smile चेहऱ्यावर खुलून द्यायची,घरच्यांना वाटलं पाहिजे येड झालं ते.कधी तरी उगाच clg ला जाऊन lecture नाही करायचे.बसायचं कोठे तरी झाडाखाली,कॅन्टीन मध्ये कोठे तरी शांतपणे एकटक बघत.उगाच आठवून बघायचा कोणाचा तरी चेहरा,उगाच कडक ऊन असताना पावसात भिजल्याची फील घेत बसायचं.रूममध्ये एकट असेल तर वेड्यागत गायचं,नाचायच जरी नसल जमत.उगाच भरभरून बोलायच कोणाशी तरी उगाच रागवायच,काही तरी बरमळत बसायचं.कोणाकडे तरी बघून उगाच हसायचं...लहान मुलाचा फुगा फोडून पळायचं... काही तरी चोरून दुसऱ्यांना वाटत बसायचं...निर्जिवांशी बोलत बसायचं.हसायचं,खेळायचं जे वाटेल ते करायचं.....येड म्हटलं तर क्षणिक.... कविता करण्यापेक्षा तरी बरच असत रे!
Comments
Post a Comment