Posts

आठवणी शाळेच्या

भूर भूर म्हणता म्हणता कधी दिवस भुर्रकन गेले,कळलेसुद्धा नाही!! कॉलेजला जायच्या पुढे काहीतरी भविष्यात बनायच्या ध्येयापुढे या सोनेरी पानाला आपण अगदी, सहज उडत्या पांढऱ्या म्हातारीला तिच्या बी मधून काढून एक एक वाऱ्यावरून भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात पायघड्या टाकत आलो..आता ते बालपणाचा सोनेरी पान फक्त दुरून पाहता येतं.. जून चा १५ तारखेला उत्साहाने सुट्टीला कंटाळून शाळेत जाणारी पोर कायम पहिल्या पाच मध्ये बघायला भेटायची अन् दुसरी ' १५ कशाला तारीख दिली,२० द्यायला पाहिजे होती म्हणून निर्णयावर रेघोट्या मारत बसायची मी सुद्धा त्यातलाच एक होतो..बघता बघता शाळेतलं मातीचा मैदान कधी दगडी विटांनी भरला कळलं पण नाही अभ्यास झाला नाही म्हणून बाईंनी कित्तेक वेळा बाहेर बसवला.. तो क्षण कधी विसरणारा नसतो पण मजेशीर असतो वहीच्या पानाच्या मागे रुपया ठेवून कागदावर पेन्सिल नी गिरवून स्वतःला एका चांगल्या चित्रकारान पैकी एक समजणे ही देखील मोठी कला होती.. शेवटच्या बाकावर बसून बाक वाजवून सगळ्यांचे पाय झुलते करणे, हे देखील एक कलाकार म्हणून ओळखला जायच...(मी)... मॉनिटर नी वहीत नाव लिहला तर ते शिक्षकांना सांगू न...

एक इंजिनीअर

अपेक्षांचं  ओझं  उरी हे  पेललेल , लहानपण  त्याच अभ्यासात  गेलेलं ... निरागस मन त्याच कोणालाच  नाही कळलं , मग अनोळखी  स्वप्नांकडे मन त्याच  वळलं .... अपेक्षांचं विषही  अमृत  समजून त्याने  पिलं , Engineering नावाच  स्वप्न जणू त्याला फुकटच  दिलं............... Engineering च्या वाटेला त्याला प्रेमाने ढकलला , परतीचा  रस्ता मात्र साखळदंडांनी  जकडला ..... स्वप्नांची  वाट त्याच्या दिसेनाशी  झाली , जणू आपल्याच  माणसांनी  स्वप्न  चोरून  नेली .. तरी  अनोळखी  वाटेवर तो  आनंदाने चालत राहिला , दुसऱ्यांची  स्वप्न आपली मानत राहिला... .................. थंडी पावसाळ्यात लोकं फिरायला जायचे , तेव्हा  मात्र  त्याचे paper असायचे .... रात्र रात्र जागून  एक एक subject त्याने काढले , Enjoyment चे कधी दर्शनही  नाही घडले .... File लिहून लिहून  बोट अशी काही सुजली , लोकांनी जणू परिस्थितीच्या  दगडा खाली  ती दाबली .............. सबमिशन च्या ...

ये नंबर वन यारी है...

Image
आयुष्याच्या प्रवासात मुसाफिरी करीत फिरलं की प्रत्येक वळणावर आपण अनेक मित्र कमावतो. खूप नवीन नाती बनतात, मग ती कितीही घट्ट का असेना त्यांना जुन्या मैत्रीची सर  येत नाही. जसा मुराब्बा मुरतो ना काळासोबत तसच या मैत्रीचही असत. प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक-दोन मित्र असतात जे लहानपणी पासून सोबत असतात. या जुन्या मैत्रीच गणित पण खूप वेगळं असत. इथे एकापेक्षा शून्याला जास्त किंमत असते, कारण अपेक्षांचं ओझ इथे कधीच एकमेकांवर लादलं जात नाही. काही कारणामुळे आपल्यातले अंतर वाढते पण आपली मैत्री तशीच टिकलेली असते. वर्ष्यातून एकदा भेट होते काही मित्रांची पण त्या भेटीत तीच ताजगी असते. जेंव्हा पण बोलण होत लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो, कसे शाळेत धिंगाणा घालायचो, कसे  क्लास सुटल्यावर गल्लीतून पळत जाऊन आपल्या क्रश ला बघायला धावपळ करायचो आणि हो दोघांचीही क्रश एकच असते बर का! वर्ग वेगळा असला तरी मधल्यासुटीत त्याच्या वर्गात जाऊन कसे जेवायचो, सगळं सगळं आपण पुन्हा एकमेकांना सांगत बसतो. फ्लॅशबॅक म्हणतात ना तो हाच, मग आपल वय किती ही होऊ तो चालणारच. या मित्रांना आपण अजूनही लहानपणी ज्या नावानी बो...

चला थोडं आठवणीत रमू....

तस मागे वळून पाहिलं की खूपदा आठवणी आपल्याला बोलवताना दिसतात, आता या तिच्या आठवणी नाहीयत, पण नक्कीच आपल्या सर्वांच्या आठवणी आहेत. कधीतरी एकांतात अस मागे वळून, मनाच्या डोहात आतवर जाऊन प्रत्येकाने ती आठवणींचे शिंपले नक्की उघडून पाहावेत.  आजही आठवत मला जेंव्हा हाफ पॅन्ट घालून आम्ही सगळे शाळेत जायचो, बेंच वर रेषा मारून आपआपल्या हिस्स्यावर मालकी गाजवायचो. चालू तासाला जलजीरा चाटायला जी मजा यायची ती महागातल्या कॅफेत सुद्धा मिळणार नाही. शाळा सुटली का उनाड भटकत फिरायच, कडक ऊन असलं की एखाद्या मित्राच्या घरी निवांत झोपायच. आणि हो ते पत्र्यावर चढून टीव्हीचा अँटेना ठीक करणं एक साहसी काम असायचं. काळ्या पांढऱ्या पटावर येणाऱ्या मुंग्या मात्र खडू मारून सुद्धा जायच्या नाहीत, कुरापती करून कधी कधी दुसऱ्याच्या केबल चे चॅनेल मात्र ढापता यायचे. आधी पत्रात मस्त गोड गोड पापे मिळायचे, रक्षाबंधनला राखी सोबत साखरेचे कणही चिटकून यायचे. कधी फोन आलाच कुणाचा तर शेजारच्या काकू कडे यायचा, नाहीतर STD मधून किंमत देऊन लावायचा. आम्ही आहोत त्या जमान्यात जन्मलेले ज्याने मोबाइल फोनची पूर्ण उत्क्रांती बघितलीय, काळ्या पांढऱ...

उगाच...

उगाच हेडफोन घालून अरजित, जगजीत ऐकत बसून ब्रेकअप वाली पण फिलिंग घेऊन बघावी.जरा कमी पण कोणाची तरी आठवण काढून नाजूक smile चेहऱ्यावर खुलून द्यायची,घरच्यांना वाटलं पाहिजे येड झालं ते.कधी तरी उगाच clg ला जाऊन lecture नाही करायचे.बसायचं कोठे तरी झाडाखाली,कॅन्टीन मध्ये कोठे तरी शांतपणे एकटक बघत.उगाच आठवून बघायचा कोणाचा तरी चेहरा,उगाच कडक ऊन असताना पावसात भिजल्याची फील घेत बसायचं.रूममध्ये एकट असेल तर वेड्यागत गायचं,नाचायच जरी नसल जमत.उगाच भरभरून बोलायच कोणाशी तरी उगाच रागवायच,काही तरी बरमळत बसायचं.कोणाकडे तरी बघून उगाच हसायचं...लहान मुलाचा फुगा फोडून पळायचं... काही तरी चोरून दुसऱ्यांना वाटत बसायचं...निर्जिवांशी बोलत बसायचं.हसायचं,खेळायचं जे वाटेल ते करायचं.....येड म्हटलं तर क्षणिक.... कविता करण्यापेक्षा तरी बरच असत रे!

असेही एकदा व्हावे

असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जुने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस आपण आठवतो त्यात हा पहिला असतो आपण त्या दिवसामध्ये किती मस्ती मज्जा करत असायचो. ते दिवस पण काय होते जिथे कमी बंधने होती आणि लाड जास्त होत असायचे जास्त आणि चूक जर झाली तर मार पडायचा पण त्यात प्रेम पण असायचे. ते दिवस असे आहे ते जगण्यासाठी मी आत्ता त्या वेळेत जाऊ शकतो. कारण त्या वेळेमध्ये ना मोबाईल, टीव्ही, ना प्ले स्टेशन नाही व्हॉटसअप आणि फेसबुक सुद्धा पण लहान होण्याचा जास्त फायदा होता लाड जास्त होत असतात आपले पण सर्वात जास्त लाड एकाचे होतात ज्या घरामध्ये सर्वात लहान जो असायचा त्याचा लाड खूप जास्त होत असतो. ते जाऊद्या पण लहान पणाची काय मज्जा होती काही सकाळी लवकर उठणे तयार होणे, पूजा करणे, शाळा दुपारची असल्यामुळे आपण थोडे लेट उठयाचो पण काहीची शाळा सकाळी होती त्यांना जर लवकर उठावे लागत होते. घरी वापस आले की आपण आपला अभ्यास करून कारण...

LIFE MEANS WHAT....?

1.रात्री च एकटाच long drive ला निघालेलो ....सोबत गार वारा ...आणि हेड फ़ोन मध्ये अरिजित सिंग ची गाणी ...... 2.रात्रीं 1 ची वेळ हातात गरमागरम चहाचा कप ....मी आणि ती balcony मध्ये थांबलेलो ...मंद असा गार वारा वाहत असेन ...तिने घट्ट असा दोन्ही हाताने चहाचा कप धरून ठेवला असेन...आणि आमच्या कॉलेज च्या गप्पा चालू असतील कि मी किती मूर्ख होतो आधी...... 3.एक गाडी ..मोकळा रस्ता...गाडीत फक्त ती आणि मी ..रात्रीची वेळ... खिडकीतून तिचे केस उडवत येणारा गार वारा...आमच्या दोघातील ती शांतता ...... .आणि त्या क्षणी मी रेडिओ लावावा ...आणि लग जा गले हे गाणं लागावं ...आणि आम्ही दोघे हि एकमेकांकडे बघून हसावं ... 4.रात्र झालेली असेन ...बाहेर गुलाबी थंडी ..आणि रोड वर ती आणि मी दोघेच ...गप्पा मारत एक long walk ला चाललेलो ...आणि अचानक चहाची टपरी दिसावी... 5.मी कॉलेज ला जात असावो ...पाऊस येत असावा ...मी छत्री घेऊन चालत असावो..आणि तिची छत्री विसरली म्हणून अचानक ती छत्री मध्ये यावी ... 5. लग्न झाल्यावर ....एक दिवस मी kitchen वट्ट्यावर बसलेलो असावो ...ती चपात्या लाटत असेन....आणि मी तिला तिच्यावरच्या सगळ्या कविता ऐकवत अ...