आठवणी शाळेच्या
भूर भूर म्हणता म्हणता कधी दिवस भुर्रकन गेले,कळलेसुद्धा नाही!! कॉलेजला जायच्या पुढे काहीतरी भविष्यात बनायच्या ध्येयापुढे या सोनेरी पानाला आपण अगदी, सहज उडत्या पांढऱ्या म्हातारीला तिच्या बी मधून काढून एक एक वाऱ्यावरून भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात पायघड्या टाकत आलो..आता ते बालपणाचा सोनेरी पान फक्त दुरून पाहता येतं.. जून चा १५ तारखेला उत्साहाने सुट्टीला कंटाळून शाळेत जाणारी पोर कायम पहिल्या पाच मध्ये बघायला भेटायची अन् दुसरी ' १५ कशाला तारीख दिली,२० द्यायला पाहिजे होती म्हणून निर्णयावर रेघोट्या मारत बसायची मी सुद्धा त्यातलाच एक होतो..बघता बघता शाळेतलं मातीचा मैदान कधी दगडी विटांनी भरला कळलं पण नाही अभ्यास झाला नाही म्हणून बाईंनी कित्तेक वेळा बाहेर बसवला.. तो क्षण कधी विसरणारा नसतो पण मजेशीर असतो वहीच्या पानाच्या मागे रुपया ठेवून कागदावर पेन्सिल नी गिरवून स्वतःला एका चांगल्या चित्रकारान पैकी एक समजणे ही देखील मोठी कला होती.. शेवटच्या बाकावर बसून बाक वाजवून सगळ्यांचे पाय झुलते करणे, हे देखील एक कलाकार म्हणून ओळखला जायच...(मी)... मॉनिटर नी वहीत नाव लिहला तर ते शिक्षकांना सांगू नये म्हणून ते वाचवण्यासाठी केलेली धडपड कधी विसरू शकणार नाही.. खोडरबर वर डोक्याचं तेल लावून छापा छापी करणारे एका जादूगार ची फिलिंग घेऊन बसायचे भांडणच रूपांतर कधी क्रिकेट मॅच मध्ये होयचा आम्हाला सुद्धा कळायचं नाही..वर्ग चालू असताना पडलेल्या दोन टीम कायम पक्क्या ठरल्या जिवावर आलेल्या घटक चाचण्या, साहमाह्या,आणि त्याहून मनाला टोचून जाणारे वर्गात येऊन सरांनी सांगितलेले मार्क त्याची धडधड ते वाढवून भेटल्यावर भेटलेल्या आनंद कधीही स्मरणात राहील माफ करा!!!मी देखील शाळेत जात होतो म्हणून शाळेच्या काही आठवणी टाकल्या कोणाच्या आठवणींच्या खपल्या निघाल्या असतील तर comment मध्ये कळवा....
Comments
Post a Comment