एक इंजिनीअर


अपेक्षांचं  ओझं  उरी हे  पेललेल ,
लहानपण  त्याच अभ्यासात  गेलेलं ...
निरागस मन त्याच कोणालाच  नाही कळलं ,
मग अनोळखी  स्वप्नांकडे मन त्याच  वळलं ....
अपेक्षांचं विषही  अमृत  समजून त्याने  पिलं ,
Engineering नावाच  स्वप्न जणू त्याला फुकटच  दिलं............... Engineering च्या वाटेला त्याला प्रेमाने ढकलला ,
परतीचा  रस्ता मात्र साखळदंडांनी  जकडला .....
स्वप्नांची  वाट त्याच्या दिसेनाशी  झाली ,
जणू आपल्याच  माणसांनी  स्वप्न  चोरून  नेली ..
तरी  अनोळखी  वाटेवर तो  आनंदाने चालत राहिला ,
दुसऱ्यांची  स्वप्न आपली मानत राहिला... ..................
थंडी पावसाळ्यात लोकं फिरायला जायचे ,
तेव्हा  मात्र  त्याचे paper असायचे ....
रात्र रात्र जागून  एक एक subject त्याने काढले ,
Enjoyment चे कधी दर्शनही  नाही घडले ....
File लिहून लिहून  बोट अशी काही सुजली ,
लोकांनी जणू परिस्थितीच्या  दगडा खाली  ती दाबली ..............
सबमिशन च्या गटारात  असा तो बुडाला ,
एवढा  अभ्यास करूनही  विषय  त्याचा उडाला ...
सगळ्या semester नि मिळून आवळला  त्याचा गळा,
YD या शब्दाने  त्याचा जीवचं  कळवळला ..
Derivation अन Formulyani त्याला  खूप  पिडला ,
Problems solve करून करून  कणा पाठीचा  मोडला .........
Fm physics  chemistry MATH'S....ऐकूनच  थांबला  त्याचा श्वास ,
त्यात integration निघाला  शत्रू  मोठा  खास..... ...............
Oral आणि practical नि असं त्याला घाबरवलं ,
जगायचं कि मारायचं  या प्रश्नात  मन हरवलं ..... ...........
दुसऱ्यांच्याच  स्वप्नांसाठी  त्याने जन्म वाहिला ,
त्याच्या स्वप्नांचा  canvas मात्र कोराच  राहिला ... ...........
ध्येय साध्य  करण्याचा  नेम  थोडक्यात  चुकला ,
एवढं  सगळं करूनही जॉब  ला  मात्र तो मुकला ...

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

THE HALF LOVE STORY 6