Posts

Showing posts from April, 2020

आठवणी शाळेच्या

भूर भूर म्हणता म्हणता कधी दिवस भुर्रकन गेले,कळलेसुद्धा नाही!! कॉलेजला जायच्या पुढे काहीतरी भविष्यात बनायच्या ध्येयापुढे या सोनेरी पानाला आपण अगदी, सहज उडत्या पांढऱ्या म्हातारीला तिच्या बी मधून काढून एक एक वाऱ्यावरून भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात पायघड्या टाकत आलो..आता ते बालपणाचा सोनेरी पान फक्त दुरून पाहता येतं.. जून चा १५ तारखेला उत्साहाने सुट्टीला कंटाळून शाळेत जाणारी पोर कायम पहिल्या पाच मध्ये बघायला भेटायची अन् दुसरी ' १५ कशाला तारीख दिली,२० द्यायला पाहिजे होती म्हणून निर्णयावर रेघोट्या मारत बसायची मी सुद्धा त्यातलाच एक होतो..बघता बघता शाळेतलं मातीचा मैदान कधी दगडी विटांनी भरला कळलं पण नाही अभ्यास झाला नाही म्हणून बाईंनी कित्तेक वेळा बाहेर बसवला.. तो क्षण कधी विसरणारा नसतो पण मजेशीर असतो वहीच्या पानाच्या मागे रुपया ठेवून कागदावर पेन्सिल नी गिरवून स्वतःला एका चांगल्या चित्रकारान पैकी एक समजणे ही देखील मोठी कला होती.. शेवटच्या बाकावर बसून बाक वाजवून सगळ्यांचे पाय झुलते करणे, हे देखील एक कलाकार म्हणून ओळखला जायच...(मी)... मॉनिटर नी वहीत नाव लिहला तर ते शिक्षकांना सांगू न...

एक इंजिनीअर

अपेक्षांचं  ओझं  उरी हे  पेललेल , लहानपण  त्याच अभ्यासात  गेलेलं ... निरागस मन त्याच कोणालाच  नाही कळलं , मग अनोळखी  स्वप्नांकडे मन त्याच  वळलं .... अपेक्षांचं विषही  अमृत  समजून त्याने  पिलं , Engineering नावाच  स्वप्न जणू त्याला फुकटच  दिलं............... Engineering च्या वाटेला त्याला प्रेमाने ढकलला , परतीचा  रस्ता मात्र साखळदंडांनी  जकडला ..... स्वप्नांची  वाट त्याच्या दिसेनाशी  झाली , जणू आपल्याच  माणसांनी  स्वप्न  चोरून  नेली .. तरी  अनोळखी  वाटेवर तो  आनंदाने चालत राहिला , दुसऱ्यांची  स्वप्न आपली मानत राहिला... .................. थंडी पावसाळ्यात लोकं फिरायला जायचे , तेव्हा  मात्र  त्याचे paper असायचे .... रात्र रात्र जागून  एक एक subject त्याने काढले , Enjoyment चे कधी दर्शनही  नाही घडले .... File लिहून लिहून  बोट अशी काही सुजली , लोकांनी जणू परिस्थितीच्या  दगडा खाली  ती दाबली .............. सबमिशन च्या ...

ये नंबर वन यारी है...

Image
आयुष्याच्या प्रवासात मुसाफिरी करीत फिरलं की प्रत्येक वळणावर आपण अनेक मित्र कमावतो. खूप नवीन नाती बनतात, मग ती कितीही घट्ट का असेना त्यांना जुन्या मैत्रीची सर  येत नाही. जसा मुराब्बा मुरतो ना काळासोबत तसच या मैत्रीचही असत. प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक-दोन मित्र असतात जे लहानपणी पासून सोबत असतात. या जुन्या मैत्रीच गणित पण खूप वेगळं असत. इथे एकापेक्षा शून्याला जास्त किंमत असते, कारण अपेक्षांचं ओझ इथे कधीच एकमेकांवर लादलं जात नाही. काही कारणामुळे आपल्यातले अंतर वाढते पण आपली मैत्री तशीच टिकलेली असते. वर्ष्यातून एकदा भेट होते काही मित्रांची पण त्या भेटीत तीच ताजगी असते. जेंव्हा पण बोलण होत लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो, कसे शाळेत धिंगाणा घालायचो, कसे  क्लास सुटल्यावर गल्लीतून पळत जाऊन आपल्या क्रश ला बघायला धावपळ करायचो आणि हो दोघांचीही क्रश एकच असते बर का! वर्ग वेगळा असला तरी मधल्यासुटीत त्याच्या वर्गात जाऊन कसे जेवायचो, सगळं सगळं आपण पुन्हा एकमेकांना सांगत बसतो. फ्लॅशबॅक म्हणतात ना तो हाच, मग आपल वय किती ही होऊ तो चालणारच. या मित्रांना आपण अजूनही लहानपणी ज्या नावानी बो...